अशाच एका सायंकाळी
बसलो होतो झाडाखाली ..
भविष्य चिंतित आयुष्याचे
भूत घेउनी वर्तमानाचे ..
वादळ ते घोंघावत आले
विचार सैरावैरा धावले ..
काही कळेना काय करावे
वादळी मना कसे सावरावे ..
....गळले पुढ्यात पिवळे पान
झाडावरुनी खाली छान ..
उगाच चिंता नकोच मनी
गेले पान मनास शिकवुनी ..
क्षणात आहे- क्षणात गायब
ईश्वर लीला किती अजब ..
समाधान चित्तात रहावे
पुढ्यात आहे त्यात रमावे . .!
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा