आज प्रेम अगदी उतू जाण्याचा दिवस......
पण -
ह्या बायकांचं मानसशास्त्र काही कळतच नाही ब्वा !
मी माझ्याच घरात-
खोकला, सर्दी, पडसे, थंडीताप,डोकेदुखी इत्यादी इत्यादीनी अगदी बेजार झालो आहे. .
अशावेळी बायकोने...
जवळ येऊन ...
माझ्या डोक्याला बाम चोळावा ,
नाकाला विक्स फासावे ,
घशात क्रोसिन कोंबावी ,
हाताशी रुमाल धरून उभे रहावे --
बस्स .. एवढ्याच तर आज माझ्या अपेक्षा !
- आणि माझ्या अशा परिस्थितीत,
मला एकट्याला घरात सोडून,
बायको गेली आहे माहेरी ...
कशाला म्हणून काय विचारताय !
ती गेलीय,
तिच्या बहिणीच्या दिराच्या मामाच्या पोरीच्या नणंदेला "सर्दी झाली आहे" असे "कळल्याने",
"चौकशी" करायला -- सकाळी सकाळी !
सकाळचा..
पहिल्या प्रेमाचा हक्काचा ताजा गरम गरम चहाही....
आता स्वहस्तेच की हो !
तोपर्यंत ...सर्वाना "सुप्रभात !"
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा