चारोळी चौकट

१.
'शब्दा तुझा मी सोनार -'मोहित करती मुळी न मजला 
हिरे माणके आणिक सोने - 
शब्दांना कवितेत गुंफुनी
मीच घडवतो खरे दागिने .. 
.२.
'वेड्या जिवाची वेडी ही माया -'दुरावलेल्या वासरासाठी 
गोठयात हंबरणारी गाय असते -
वाट चुकलेल्या लेकरासाठी 
घरात क्षमा करणारी माय असते ..
.३.
'अनपेक्षित -'वाट तुझ्या पत्राची पाहत असतांना 
एसेमेस कधी आला, तेही नाही कळले -
विचार तुला भेटण्याचा मनात यावा, 
त्याआधीच तू भेटावीस, असे जणू घडले ..
.४.
'ज्याची त्याची चौकट -'श्रीमंताने बसवले सोन्याच्या चौकटीत 
गुदमरणाऱ्या श्रीमंत साईला -
गरिबाने बसवले हृदयाच्या चौकटीत 
साध्यासुध्या फकीर साईला ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा