हेवा


शाळा सुटल्यानंतर 

पाऊस ओसरल्यानंतर

सुरू होतो 

मुलांचा किलबिलाटरस्त्यातून साचलेल्या 

पाण्याच्या डबक्यातून 

धबक धबक धबक 

पाण्याचा आवाज करतमुलीमुले हर्षोल्हासात

नाचकाम करत 


एकमेकांच्या अंगावर 

तुषार फवारे कारंजी 

उडवत तुडवत भिजवतइतर सगळे जग 

विसरून जाऊन स्वत:च्याच जगात

धिंगाणा मजा दंगामस्ती

करत करत करत...............-- पावसा रे पावसा,

असाच येत जा रे 

त्या चिमुकल्या जिवांना

आनंदी ठेवायला ...- आणि त्या दंगमास्तीचा

मला वाटणारा हेवा 

आणखी वाढू द्यायला !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा