मोबाईलवेडे

नवरा बायको दोघांनाही 
मुलीने घेऊन दिलेल्या मोबाईलचे अतोनात वेड.

मोबाईलची माहिती दोघांनाही 
कामापुरती जुजबी झालेली !

 एकदा ती साडीखरेदीसाठी बाहेर गेली होती.
दुकानात शंभर साड्यांच्या अस्ताव्यस्त ढिगात 
असतानाच -
ग्यासवर तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाची,
 तिला अचानक आठवण झाली..

घाईघाईने तिने आपल्या हातातल्या 
मोबाईलवर नवऱ्याला संदेश पाठवला-
"अहो, ग्यासचे बटन तेवढे पट्कन बंद करा !"  

नवरा घरीच हातातल्या मोबाईलला कुरवाळत बसला होता.
बायकोचा संदेश त्याने वाचला.

काही वेळातच-
 बायकोने आपल्या मोबाईलवर आलेला 
नवऱ्याचा संदेश वाचला -

"ग्यास बंद करायचे बटन,
मोबाईलवर कुठेच दिसत नाही की ग !"
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा