जन्माला आलो जगती नशिबी जपणे आले--[गझल]

जन्माला आलो जगती नशिबी जपणे आले
मरणे ना अपुल्या हाती जीवन जगणे आले..

खुडताना पुष्पे भवती टोचत काटे होते 
कुरवाळत आता जखमा नुसते बसणे आले.. 

बघण्याला घायाळाला जेव्हा सारे जमले
ना जखमी दिसण्यासाठी खोटे हसणे आले..

आनंदी त्यांनी व्हावे झालो वाल्या कोळी
दु:खाला साथी नाही नुसते खपणे आले..

हे जीवन दुस-यासाठी का मज जगण्यासाठी
ना अजुनी सुटले कोडे भाळी फसणे आले ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा