सहा चारोळ्या -

'दयाळू -'

लाडक्या भूभू,मनीमाऊची 
होऊ नये घरात आबाळ -
म्हणून सासूसासऱ्यांचं तिनं 
धाडलं वृद्धाश्रमात गबाळ !
.

'सोबती-'

लपवण्याला मदत करतो
आसवांशी जवळीक माझी -
भावतो काळोख म्हणुनी 
जोडी जमते त्याची नि माझी ..
.

'लेक ती लेकच -'

लेकीचा पापड
रेशमी कापड                    
सुनेचा पापड
कायम वातड !
.

'स्वच्छता अभियान -'

लोटतो कचरा माझ्या दारी
दुष्ट किती माझा शेजारी -
मग रागारागाने मीही 
सारतो कचरा पुढच्या दारी ..
.

'हाच तो क्षण -'

लिहिता येते तोवर लिहावे 
जगता येते तोवर जगावे -
पुढचा क्षण हातात कुठे 
सर्वजण हसताना बघावे ..
.

'साक्षात दर्शन -'

लिहावयाला गझल मी बसलो 
समोर अवचित दिसलीस तू -
लिहू कशाला गझल मी आता 
समोर असता गझलच तू ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा