सहा चारोळ्या -

घाव खोलवर करून गेला
स्पर्श तुझा ओझरता झाला -
पुन्हा वाट पाहते जखम ग 
अधीर स्पर्शाच्या मलमाला ..
.

घडला गुन्हा का माझा देवा 
सुखाची राई मागितली मी -
केलास उभा पर्वत अख्खा
माझ्यापुढे दु:खाचा नेहमी ..
.

घरात बसून माझी आठवण
कितीदा काढणार तिकडे -
ये ना घरी माझ्या सरळ 
त्रास उचक्यांचा थांबेल इकडे . . 
.

घरट्यात जा स्वप्नपाखरांनो 
पुरे झाले उगा रेंगाळणे -
थकली असेल आता सखी 
आहेच पुन्हा रात्री न्याहाळणे ..
.

"घालावी गवसणी आकाशाला"
पाहत वर मी ठरवत गेलो -
खालचा खड्डा दिसला नाही
प्लास्टरमधे मी मिरवत आलो ..
.

घरात गातो, सुरात गातो
बाथरूम सिंगर तो गातो-
कपडे असतानाही गातो
नसताना तर जोरात गातो..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा