माणूस म्हणुन कौतुक जिव्हा कधी न करते
जिव्हेस सवय पक्की निंदेत मस्त रमते ..
वारीत शिस्त न्यारी पाहून थक्क सारी
सत्ता पदी भुकेले कोणीहि तेथ नसते
आयुष्य अल्प असते ठाऊक सर्व लोका
सत्कर्म सोडुनी का स्वार्थामधेच सरते
जवळीक वेदनांशी झाली अतीच माझी
करता विचार त्यांचा का काळजात दुखते
मी शोध गंधवेडा जागेपणीहि घेतो
गंधास फूल जेव्हा स्वप्नातुनी पसरते ..
.
जिव्हेस सवय पक्की निंदेत मस्त रमते ..
वारीत शिस्त न्यारी पाहून थक्क सारी
सत्ता पदी भुकेले कोणीहि तेथ नसते
आयुष्य अल्प असते ठाऊक सर्व लोका
सत्कर्म सोडुनी का स्वार्थामधेच सरते
जवळीक वेदनांशी झाली अतीच माझी
करता विचार त्यांचा का काळजात दुखते
मी शोध गंधवेडा जागेपणीहि घेतो
गंधास फूल जेव्हा स्वप्नातुनी पसरते ..
.
सुरेखच ...
उत्तर द्याहटवाअमोल जी -
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल धन्यवाद !