हा कोणाचा नवाच फतवा - - [गझल]

वृत्त- त्रिलोकगामी 
लगावली- गागागागा लगालगागा 
मात्रा-  १६ 
 - - - - - - - - - - - - - - - - - - - -
हा कोणाचा नवाच फतवा
कायम अफवा नवी पसरवा ..

खाक्या इथला जगात न्यारा
नियमांना पण खुशाल तुडवा..

जीवननौका बुडू पहाते
तिजला आता तटास हलवा ..

हसवत राहू किती असा मी
एक मुखवटा नवाच चढवा ..


 मधुमेही तो जरी अतीथी
मिष्टान्नेही खुशाल भरवा ..

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा