तीन चारोळ्या -

'आधार -'

जीवननौका हेंदकळणारी 
निश्चल दीपस्तंभ तुझा ग -
दिशाहीन भरकटलो तरी 
आधार मला आहेच तुझा ग ..
.

'वास्तव चटके -'

जगायला आता
जमत नाही -
जगायची आशा
सुटत नाही ..
.

'अजब गजब -'

ज्या सबलांच्या चरणी काहीवेळा 
माथा टेकवावा लागतो भल्याभल्यांना -
एवढेसे झुरळदेखील क्षणात एका  
भांगडा करायला लावते त्या सबलांना.. 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा