कवितेचे घेउन बाड मी -

कवितेचे घेऊन बाड मी 
भटकत गेलो कुठेतरी मी..

इकडे तिकडे फिरताना मी 
चुकून शिरलो जंगलात मी ..



पाहिले समोर ससे मोर मी 
हरणे हत्तीही पाहिले मी .. 

घुर्र घुर्र कुणाची ऐकली मी 
इकडेतिकडे बघीतले मी ..

अचानक मागे वळलो मी 
वाघ येताना पाहिला मी..

एवढा मोठा हुशार कवी मी 
घामाने चिंब डबडबलो मी ..

घडले आश्चर्य सांगतो मी
वाघ बघत जरी घाबरलो मी..

ऐकत डरकाळी त्याची मी 
मनी ठरवली युक्ती नामी..

दोन पावले हललो पुढे मी 
वाघ दचकला पाहिलेच मी..

ठोकत आरोळी वदलो मी -
"ऐकवतो तुजला कविता मी !"

- सुनावता त्यालाच असे मी 
युक्ती माझी आली कामी..

शेपुट घालुन जंगलस्वामी
धूम ठोकता पाहिलेच मी ..

कवितेपासून पळती नेहमी 
दूर स्वत: म्हणणारे मी मी-
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा