हातुन अपुल्या घडवत नाही - [गझल]

मात्रावृत्त -
मात्रा- ८+८ 
 - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
हातुन अपुल्या घडवत नाही 
पाय खेचणे करमत नाही....

ना जमते ते स्वत:स लिहिणे 

लिहिती दुसरे बघवत नाही..

वरचढ दुसरा कोणी दिसता 

खोडा घाला बसवत नाही..

बोलत नसतो स्वत:हून तो 

री दुसऱ्याची ओढत नाही..

ना आपणही करती काही 

मदत दुजाला करवत नाही..

ना सहभागी कधीच कामी 

बडबडीविना करमत नाही .. !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा