अत्याचारी काही घडून जाते - [गझल]

मात्रावृत्त- 
मात्रा- २० 
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 
अत्याचारी काही घडून जाते 
हळुवार हृदय हे घाबरून जाते ..

शब्द पण कसे होती केविलवाणे 
उदास होतच गाणे रडून जाते ..

दाटे माझ्या किती काळोख मनात 
अवतीभवती जग हे विरून जाते ..

जीवन गलबत शिडासहित हे माझे 
कसे अचानक नकळत बुडून जाते ..

वेदनेचीच धुवाधार ती वर्षा 
छत्र सुखाचे त्यातच जिरून जाते ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा