तू वाचतेस कविता - [गझल]

वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
- - - - - - - - --  - - - - - - - - - - - - - - -- - -- - 
तू वाचतेस कविता पाहून ऐकता मी   
देतेस ताणुनी तू खुश्शाल वाचता मी..  

गेली सुकून पुष्पे हातातली ग माझ्या 
येणार ना कधी तू त्यांना बजावता मी..

पेशात विदुषकाच्या सांभाळतो स्वत:ला 
दडवून वेदनेला हास्यात रमवता मी..

रागावतेस का तू झाला उशीर थोडा 
फिरलो तुझ्याचसाठी गजऱ्यास शोधता मी..

तव कुंतलास काळ्या बाजूस सार सखये 
पाहू कसा रवी तो पूर्वेस उगवता मी..

पर्वत नकोस दावू मजलाच वेदनांचा
दिसलो तुला कधी का आनंद भोगता मी..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा