मरायला मी गेलो तिकडे
आठवता तू आलो इकडे
.
दिसता पैसा हरती नाती
पायहि वळती वैभव जिकडे
पायहि वळती वैभव जिकडे
.
वास फुलाचा हवेत शिरता
वळतो अंधहि अचूक तिकडे
वळतो अंधहि अचूक तिकडे
.
उगवते कसे दुष्काळातहि
पिक अफवेचे पण चोहिकडे
पिक अफवेचे पण चोहिकडे
.
दिसता पुसती मंदिरात मज
आज उगवला सूर्य कुणिकडे
आज उगवला सूर्य कुणिकडे
.
बसतो पाहुन तिला तिथे मी
का सरते ती अजुन पलिकडे
का सरते ती अजुन पलिकडे
.
विसरा जाती.. हळूच म्हणती
ना जातीचा सरक अलिकडे ..
ना जातीचा सरक अलिकडे ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा