" आरसा - - -" [गझल]

नक्कल माझी करी आरसा
दावी प्रतिमा खरी आरसा ..

डाव्याला तो करतो उजवा 
लबाड आहे तरी आरसा ..

मी हसलो तर तोही हसतो 
सुखात साथी करी आरसा ..

तडे मनाला जेव्हा जाती 
चरे दाखवी घरी आरसा ..

मी रडताना दु:खी तोही 
निर्जिव असतो जरी आरसा ..

समरस होई अपुल्यासंगे 
न दाखवीतो दरी आरसा ..

समोर जे ते नयनी पाही 
कास खऱ्याची धरी आरसा ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा