प्रेम तुझ्यावर बहुधा माझे जडते आहे -- [गझल]

प्रेम तुझ्यावर बहुधा माझे जडते आहे
बघता मी तुज नजर तुझी का झुकते आहे..
.
न जरी हल्ली ती मज कोठे दिसते आहे  
आठवणीच्या उदद्यानी मन रमते आहे..
.
प्रेम तिच्यावर बागेमध्ये करतो मीही 
नजर उगा का बघणाऱ्यांची जळते आहेे..
.
काळ किती ते नाही कळले बसलो आपण 
स्पर्शामधुनी संवादाला भरते आहे..
.
लपव खळी ती येताना तू गालावरची 
ना बोलाया सुचते मग मन रुसते आहे..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा