' चहा '

एक वर्ग'चहा प्या'म्हणणारा आहे.चहाने सकाळी लवकर पोट साफ व रिकामे होते,असे तो वर्ग सांगतो. शिवाय चहा पिल्याने ताजेतवाने वाटून तरतरीहि येते असे त्या वर्गाकडून म्हटले जाते.
दुसरा वर्ग 'चहा कधीही पिऊ नये'म्हणणारा आहे. काही माणसे अमक्या बुवा,महाराजाने सांगितले म्हणून 'आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले(-काही नुकसान झाले नसल्याचा,अनुभव पाठीशी असला तरीही!)',असे सांगतात
.सामान्य माणूस जास्त खोलात न जाता,'कुणी काहीही म्हणो,मी चहा पिणार'-म्हणत जमेल तितक्या वेळा चहा पितो.त्याला आरोग्याच्या दृष्टीने अपाय झालेलाही दिसून येत नाही,ही वस्तुस्थिती!
'चहा प्यावा किंवा चहा पिऊ नये',संभ्रमावस्थेत काय करावे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा