मैफील आज जमली ना रंग खास भरला - [गझल]


वृत्त- आनंदकंद 
लगावली- गागाल गालगागा गागाल गालगागा 
मात्रा- २४ 
--------------------------------------------------
मैफील आज जमली ना रंग खास भरला  
दिसली समोर ना ती कोठेतरी हरवला 

मी देवळात दमलो देवीस शोधताना  
माता घरात दिसली दारात जीव हसला

शोधीत कस्तुरीच्या गंधास दूर फिरलो 
शेजारधर्म नाते जपण्यात तो मिसळला 

पाऊस पाहण्या मी दारी उभा जरासा 
गळक्या छतातुनी तो पाठीवरी बरसला

का मित्र मीच जपला मागून घात केला
वैरी समोरुनी का जाता उगाच हसला 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा