चार चारोळ्या -

१.
दुष्काळ ..
घरात धान्याचे दाणे
मुठभर शिजवून खायाला -
शरीरात पिचलेली हाडे
चुलीत मोजून घालायाला ..
.

२.
हुरहूर -
जायचे असेल निघून तर खुश्शाल जा,
मला काही वाटणार नाही -
जाताना तू मागे वळून पाहिलेस तर मात्र,
मला ते बघवणार नाही ..
.

 

३.
कविता ..
ढग शब्दांचे गडगडतात
वीज कल्पनेची कडाडते -
बरसात विचारांची होते
मनातून कविता वाहू लागते ..
.
 
४.

मनातले -आला पाऊस अचानक जरी
आपले एक बरे असते -
आपण दोघांनीही छत्री
घरीच विसरलेली असते ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा