जीव द्यायला गेला बिचारा आगगाडीखाली
त्या गाडीला आधी नेमका अपघातच झाला,
घरी येउनी हाती विषाची शिशीच ती धरली
उघडे झाकण जवळी उंदीर मेलेला दिसला,
पंख्याला लटकून जीव तो द्यायाला बघतो
जुनाट दोरच पंख्यावरुनी तुटून की पडला,
नदीवर गेला जीव द्यायला कुंठीतच झाला
नदी कोरडी दगड नि वाळू बघुन घरी आला,
ब्लेड घेतले ऐटित हाती नस ती कापायाला
जुने गंजके दिसता जिवाचा थरकापच झाला,
भ्रमणध्वनीवर संदेशध्वनी हळुच एक वाजला
कां कू करीत प्रियतमेचा होकार परी वाचला,
वाचत असता आनंदातही घाम तया फुटला
दिल का दौरा पडुन बिचारा देवाघरी गेला !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा