अरे अरे पुरे कान्हा...
विनवते पुन्हा पुन्हा
फोडू नकोस ना घडा
मारूनिया त्याला खडा -
नको रंगाचा बेरंग
भारी खट्याळ श्रीरंग !
अंग चिंब भिजेल ना
बोभाटा रे होईल ना
काय आईला मी सांगू
नको जीव माझा टांगू -
ऊर माझा धडधडे
गाफील मी तुझ्यापुढे
मारशी तू एक खडा
दह्यादुधाचा हा सडा -
त्रास देशी येताजाता
मनीं वाढविशी चिंता -
सहवासाची ओढ कान्हा
नको लावू पुन्हा पुन्हा !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा