माझ्या संगतीत राहून,
बायको इतकी बिलंदर झाली असेल,
असे वाटले नव्हते हो मुळीच !
कालचीच गोष्ट सांगतो .....
दुपारी बायकोने मला तीनचार वेळा पुकारले तरी,
लिखाण अर्धवट कशाला सोडावे, अशा उद्देशाने मी जाणून बुजूनच थोडेसे
दुर्लक्ष केले होते.
संध्याकाळी ती मला म्हणाली -
"अहो, त्या शेजारच्या वहिनीनी तुम्हाला बोलावले आहे . काही तरी काम
आहे म्हणे तुमच्याकडे . "
ब्यांकेच काहीतरी एखादं महत्वाचं कामबीम असेल,
म्हणून मी पट्कन शेजारी जाऊन आलो...........!
घरात पाऊल टाकल्यावर बायको उद्गारली -
" ह्यापी एप्रिल फूल, मिष्टर !
मी बोलावले तर,
तुम्हाला एक सेकंद वेळ मिळत नाही ना ?
पण इतरासाठी कसा काय वेळ मिळतो हो तुम्हाला ! "
चडफडत बसण्याखेरीज आता मी दुसर काय करणार होतो !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा