हाल कैसा है जनाबका ----- !


सकाळचा चहा म्हणजे,

बायकोबरोबर काल शिळ्या वाटलेल्या


यथेच्छ गप्पाटप्पा - 


आज ताज्यातवान्या करायची संधी !
विषय एका जुन्या मित्राच्या नव्या लग्नाचा निघाला ...
बोलता बोलता मी म्हणालो -" किती हालात दिवस काढले होते बिचाऱ्याने !


आठवले की अजून अंगावर काटा येतो.


बरे झाले आता दोनाचे चार झाले.

सुखाचे दिवस पहायला मिळतील त्याला आता ! "
बायको शांतपणे उद्गारली -


" लग्न आत्तातर झालेय ना ?


खरे हाल आता सुरू होतील बघा ! "
मी रिकाम्या कपबशा आत नेत असताना....बायको फेसबुकावर लॉगिन करत होती !!!


.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा