बगळे महाराज एका पायावर ध्यान लावून,
मासा गट्टम करण्याची वाट पहातात -
संधीसाधू महाराज ध्यानातून ध्यान ठेऊन,
भक्त गळाला लागण्याची संधी पहातात !
.
बसल्या बसल्या आयुष्याची
पाने चाळत मी गेलो
बरीच पाने पाहुन कोरी
अश्रू ढाळत मी गेलो !
.
बसल्या बसल्या कुणी कुणी
हळु प्रश्नाचा टोचे काटा -
भस्सकन मनाच्या फुग्यातुनी
आठवणींचा उसळे साठा ..
.
बोलघेवडे गर्जत जाती
मर्दुमकी पूर्वजांची नेहमी -
कष्टाळू कर्तव्यच करती
कधी न गरजता, "मी" "मी" "मी" ..
.
बुरखा नास्तिकतेचा लेऊन
फुकाच टेंभा मिरवतो तो -
'अरे देवा'चा धावा पटकन
संकटात का करतो तो ..
.
बाबा, बुवा, माँ, महाराज
जनतेच्या जिवावर शाइनिंग मारतात
स्वत: लेऊन सोन्याचे साज
भक्ताच्या गळ्यात गंडेताईत सारतात !
.
बाड घेउनी काखोटीला कवी निघाला वाचायाला
आडवे आले कुत्रे नेमके त्या कवीला चावायाला -
कवीने केली सुरुवात अपुली कविता वाचायाला
कुत्रे बिचारे विसरून गेले कवीवर त्या भुंकायाला !
.
मासा गट्टम करण्याची वाट पहातात -
संधीसाधू महाराज ध्यानातून ध्यान ठेऊन,
भक्त गळाला लागण्याची संधी पहातात !
.
बसल्या बसल्या आयुष्याची
पाने चाळत मी गेलो
बरीच पाने पाहुन कोरी
अश्रू ढाळत मी गेलो !
.
बसल्या बसल्या कुणी कुणी
हळु प्रश्नाचा टोचे काटा -
भस्सकन मनाच्या फुग्यातुनी
आठवणींचा उसळे साठा ..
.
बोलघेवडे गर्जत जाती
मर्दुमकी पूर्वजांची नेहमी -
कष्टाळू कर्तव्यच करती
कधी न गरजता, "मी" "मी" "मी" ..
.
बुरखा नास्तिकतेचा लेऊन
फुकाच टेंभा मिरवतो तो -
'अरे देवा'चा धावा पटकन
संकटात का करतो तो ..
.
बाबा, बुवा, माँ, महाराज
जनतेच्या जिवावर शाइनिंग मारतात
स्वत: लेऊन सोन्याचे साज
भक्ताच्या गळ्यात गंडेताईत सारतात !
.
बाड घेउनी काखोटीला कवी निघाला वाचायाला
आडवे आले कुत्रे नेमके त्या कवीला चावायाला -
कवीने केली सुरुवात अपुली कविता वाचायाला
कुत्रे बिचारे विसरून गेले कवीवर त्या भुंकायाला !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा