विरंगुळा

चाहूल लागते 
मागे वळतो,
कुणीच नसते 
पुढे चालतो ..

पुन्हा चाहूल 
पुन्हा वळणे, 
कुणीच नसणे 
पुढे चालणे ..

आठवण होणे 
चाहूल लागणे - 
एकट्या जिवाचे 
विरंगुळ्याचे जिणे ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा