आठ चारोळ्या --------

मनोदीप -
नीट पेटवा दीप मनाचा
येऊ द्या शुभ्र प्रकाशाला -
साठवत राहू नका मुळीच
अविचारांच्या काजळीला ..
.

सुंदर काळोख -
नकोच घाई करूस सखे, 
केशसंभार दूर सारावयाची -
मलाही नाही मुळीच घाई 
सूर्योदय तो पहावयाची ..
.

खरी तृप्ती -
नको तो पिझ्झा आणिक बर्गर
नकोच तोरा चायनीजचा -
मस्त मजेचा घास सुखाचा
पिठले, भाकर, हिरवा ठेचा ..
.

अप्रूप -
नजरेच्या किल्लीने उघडतेस 
सखे, माझ्या हृदयाचे कुलूप -
म्हणून तर वाटते कायम 
आपल्या नजरानजरीचे अप्रूप ..
.

बुडत्याला -
नौका अविचाराची
काडी सुविचाराची -
ठरेल का बुडत्याची 
गरज ती आधाराची..
.

स्पर्श संदेश -
निरोप घेताना रात्री सखे, 
हाती घेतलास माझा हात -
तुझ्या स्पर्शातून समजला 
बेत उद्याच्या भेटीचा मनात ..
.

मामला खतम -
नखऱ्यात वळत मागे पाहत 
करशी किती जखमा हृदयावर -
थांब समोरच एकवार अन 
घाल घाव माझ्या हृदयावर ..
.

XXX सदासुखी -
निवडून आला नाही 
म्हणून बिघडले कुठे -
"पक्षांतरा"ची सोय आहे
तोवर त्याला मरण कुठे ..
.

२ टिप्पण्या: