भुतानमधील भूतदया
भुतानच्या दौऱ्यात,
ही एक वल्ली
फुनशोलिंग गावीेे दिसलेली..
रोज ही व्यक्ती
सातआठ कुत्र्यांना
एका पटांगणात गोळा करत जाते.
हातात
बिस्किटांचे दोनतीन मोठे पुडे
धरलेले असतात.
पटांगणात गेल्यावर,
अवतीभवती जमलेल्या
त्या श्वानमित्रांच्यासमोर
आपल्या हातातले पुडे फोडत,
ती वल्ली
निवांतपणे बिस्कीट वाटप चालू करते !
आहे ना खरोखरची भूतदया !!
.
नजरानजर अचानक
समजावले मनाला
माझ्या कितीतरी मी
हे पाहणे तुजकडे
नाही बरे रे नेहमी..
का ऐकते न मन हे
सांगीतले जरी मी
वळुनी पुन्हापुन्हा का
बघते तुला ग नेहमी..
गर्दी बघून तिकडे
रुसतो मनी इथे मी
एकांत पाहुनीया
हसतो खुषीत नेहमी..
नजरानजर अचानक
होतोच बावरा मी
त्रेधा उडे कशी मग
अवघड स्थितीत नेहमी..
.
माझ्या कितीतरी मी
हे पाहणे तुजकडे
नाही बरे रे नेहमी..
का ऐकते न मन हे
सांगीतले जरी मी
वळुनी पुन्हापुन्हा का
बघते तुला ग नेहमी..
गर्दी बघून तिकडे
रुसतो मनी इथे मी
एकांत पाहुनीया
हसतो खुषीत नेहमी..
नजरानजर अचानक
होतोच बावरा मी
त्रेधा उडे कशी मग
अवघड स्थितीत नेहमी..
.
महाशिवरात्रीचा महादिवस ...
पुणे ते भुतान व्हाया कलकत्ता (मार्गे .. ?) :
काल सायंकाळी टूर-इ-भुतान सुरू झाली आहे.
आझाद हिँद सेनेत सामील होता आले नाही,
निदान आझाद हिँद एक्सप्रेसमधे सही !
आम्ही दोघे आणि मित्र त्याच्या बायकोमेहुणीसह..
असे एकुण पाचजण !
महिलादिन जवळ आला आहे,
त्यात तीन विरुद्ध दोन, असा सामना रंगतदार होत राहणार 18 तारखेपर्यंत !
काल एकादशीचा दिवस !
रात्री आमचे दोघांचे खाणे आणि त्या तिघीँचे बोलणे यासाठी तोँडाने दुप्पट जोर धरला होता !
काल उपास असल्याने, आज खाणे पिणे जोरात चालू आहे...
.
आज सोमवार ..
महाशिवरात्रीचा महादिवस ...
वर्षभरात काही ठराविक महाउपास करतोच,
त्यापैकी हा एक दिवस !
पुण्याहून कोलकत्याला जाण्यासाठी निघतानाच,
आजच्या उपासाची जय्यत तयारी आम्ही केली होती.
आज खास शिवशंकराचे दर्शन घ्यायचे ठरवून,
सकाळी दक्षिणेश्वराचे दर्शनासाठी निघालो.
मंदिराच्या आवारात आलो तर, इतर दिवशी एकही भक्त न फिरकल्याने ओसाड वाटणारे आवार, आज सोमवारच्या महाशिवरात्रीची संधी साधून,
हजारोँच्या संख्येने दाही दिशांनी भक्तगण जमताना दिसले !
त्यामुळे ह्या महादेवाचे महादर्शन,
नंतर कधीतरी निवांत घेण्याचे आम्ही पंचमुखातून एकमताने ठरवले .
एकेक साईटसिईँगचा भाग उरकत, दक्षिणेश्वर मंदिर वगळून, तेथून 3किमी अंतर नदीतून, नौकानयनाचा आनंद लुटत, लाँचद्वारे पार करून, रामकृष्ण परमहंसांचा बेलूर मठ पाहिला.
मठाच्या प्रवेशद्वाराजवळच महादेवाचे छोटेसे टुमदार मंदिर दिसले. आम्हाला शिवानेच असे अचानक सुंदर दर्शन सत्यात दिल्याने,
आमचा आनंद मनाच्या गगनात मावेना !
महिला त्रिकुटाचे मेतकूट जमले आणि काथ्याकूट होऊन,
तिथे वाती प्रज्वलनाचा सोहळा सुखशांतीसमाधानात पार पडला !
दुपारी 2 वाजता आम्ही पाचजण कोलकत्यातील प्रसिद्ध ईडन गार्डन स्टेडियम, रायटर्स बिल्डिंग, जीपीओ बिल्डिंग, आरबीआय बिल्डिंग कारमधूनच बघत..
व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल पहायला गेलो.
सोमवार असल्याने, व्हिक्टोरिया हॉल बंद !
तेथील गार्डनमधेच बसून आम्ही पोटपुजेचा उपासधर्म पार पाडायचा विचार केला..
उपास असल्याने-
आम्ही फक्त पेरू द्राक्षे संत्री इ. फळे, श्रीखंड, खजूरलाडू, शिंगाड्याच्या पिठाचे थालपीठ, लाडू, वेफर्स, सुगंधी दूध, घट्ट दही, दहीदूधसाबुदाणा...
कसेबसे एवढ्याच खाद्यपदार्थावरच भागवले !

कुठेही जा, पळसाला पाने तीनच ..
कुठेही जा,
पळसाला पाने तीनच ..
हे वचन अगदी सार्थ ठरवले,
त्या काली माँ कलकत्तेवालीनेही !
कालीमातेच्या दर्शनाची भलतीच ओढ लागून राहिली होती,
म्हणून कारचालकाला तिकडे गाडी वळवायला सांगितले.
त्याने देवळाजवळच्या पार्किँगमधे कार उभी करून,
आम्हाला आपुलकीने सल्ला दिला,
"बाबूजी, इधरउधर ध्यान मत दीजिये । सीधा दर्शनके लाईनमेँ खडे हो जाईये ।
वो पुजारी लोग चारो ओर घूमते हैँ और लूटते हैँ । जरा सम्हालके रहना ।"
दोन मिनिटात आम्ही कालीमातेच्या देवळाबाहेर पोचतो न पोचतो,
तोच एकापाठोपाठ काही पुजारीमंडळीँचा आमच्याभवती
वावर गलका सुरू झालाच !
"दस मिनिटमेँ दर्शन करा देंगे ।"
"लाईनमेँ खडे रहनेकी आपको जरूरतही नही ।
पूजाके लिये खाली पाँच लोगोँके सौ सौ रुपये देना ।" इ. इ.
आम्ही त्यांच्या अखंड बडबडीकडे दुर्लक्ष करत,
लाईनीत खडे राहिलो...
पुन्हा लाईनीतून देवीला आम्ही "मनोभावे" नमस्कार करत होतो,
तेवढ्यात तिथल्या पुजाऱ्यांचा "मनीभावे"
पुढ्यात आणखी दक्षिणा ठेवण्याचा अत्याग्रह चालूच !
आपल्या महाराष्ट्रातल्या काही प्रसिद्ध देवांची आठवण,
त्यावेळीच मला का होऊन गेली असावी बरे !

माणूस
माणसाने म्हणे यंव केले ,
माणसाने म्हणे त्यंव केले ,
माणूस म्हणे दूरच्या ग्रहावर पोहोचला ,
माणूस म्हणे संगणक युगातले चमत्कार परदेशात जाऊन घडवू लागला ..
कोलकत्यातल्या "माणसा"ची परिस्थिती,
याची देही याची डोळा पाहून झाली ..
डोळ्यात पाणी यायचेच राहिले !
म्हणे काळ बदलत आहे ..
पण आपल्या बिचा-या वीतभर पोटासाठी,
तिथला "माणूस" आपल्याच तुटक्यामोडक्या सायकल रिक्षात,
जास्तीतजास्त आरामात दुसऱ्या "माणसा"ला बसवून ..
अद्यापही, घाम गाळतच,
आपल्या दोन्ही हातांनी रिक्षा ओढताना दिसत आहे !
.
आमचे आजोबा- [बालकविता]
दोन पाय अन आधार काठी
तीन पायांचे आमचे आजोबा..
पाठ ताठ खांदेही ताठ
ना दुखतो एकही खुबा..
दृष्टी शाबूत दातही मजबूत
हास्याचा तर नित्य धबधबा..
धाक दरारा अजून वाटतो
गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा..
गिरणीत जाती घेऊन हाती
दहा किलोचा दळण डबा..
चौरस आहार सतत विहार
आरोग्याचा मंत्र अजूबा..
नव्वदीतला तरुण जणू हा
पार शंभरी करणे मनसुबा ..
.
तीन पायांचे आमचे आजोबा..
पाठ ताठ खांदेही ताठ
ना दुखतो एकही खुबा..
दृष्टी शाबूत दातही मजबूत
हास्याचा तर नित्य धबधबा..
धाक दरारा अजून वाटतो
गल्लीत साऱ्या त्यांचा दबदबा..
गिरणीत जाती घेऊन हाती
दहा किलोचा दळण डबा..
चौरस आहार सतत विहार
आरोग्याचा मंत्र अजूबा..
नव्वदीतला तरुण जणू हा
पार शंभरी करणे मनसुबा ..
.
चांदोबाचा दिवा.. बालकवितासंग्रह .. पुस्तकपरिचय

" पुस्तक परिचय-"
लेखक- अरुण वि.देशपांडे
-----------------------------------
" चांदोबाचा दिवा " ... बालमित्रांसाठी धमाल बालकवितासंग्रह -
-----------------------------------
विजयकुमार देशपांडे हे सोलापूरचे कवी, गझलकार, चारोळीकार, त्याचबरोबर मिस्कील आणि हलकेफुलके लेखन करणारे साहित्यकार आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या पुरवणी, मासिके आणि दिवाळी अंकातून यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. बालमित्रांसाठीही ते आवर्जून लेखन करतात. किशोर मासिकात कविता प्रकाशित, तसेच पुणे आकाशवाणीवरून त्यांचे बालकवितावाचन प्रसारित झाले आहे.
इंटरनेटच्या दुनियेत त्यांनी स्वतःचा वाचक-वर्ग निर्माण केला आहे.
"लेखन प्रपंच" या त्यांच्या ब्लॉगवर त्यांचे साहित्य उपलब्ध असते.
या वाटचालीत त्यांच्या ४० बाल -कवितांचा संग्रह "चांदोबाचा दिवा " या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे., त्याचा परिचय मी करून देत आहे.
बालकवितांना आशयानुरूप रेखाटने आणि चित्र असणे, या कवितांच्या बालवाचकांसाठी खूप उपयोगाचे असते. "चांदोबाचा दिवा" या संग्रहातील कवितांच्या सोबत मस्त रंगी-बेरंगी आकर्षक चित्रांमुळे, हे पुस्तक सुरेखच झाले आहे.
बालमनाला आवडणाऱ्या विषयावरील कविता, कवी-विजयकुमार देशपांडे यांनी अतिशय सहजतेने लिहिल्या आहेत.
पक्षी-प्राणी, खेळ आणि खेळणी, आई-बाबा..आणि बाळाची दोस्त मंडळी- अशा कितीतरी विषयावरील कविता वाचनीय झाल्या आहेत.
काही कवितांचे उल्लेख आवर्जून करतो--
१. आकाश, आकाशातला चांदोबा ,चमचमत्या चांदण्या.. किती छान दृश्य असते हे.. या कवितेतील बाळ त्याच्या आईला म्हणते-
आई ग आई
चांदोबा -चांदण्या
ठेऊन अंगणात
रात्री छान खेळेन
त्यांच्या प्रकाशात... (शीर्षक कविता -पृ.४६)
२. खेळकर-खोडकर असा बाळ घरातला गुणीबाळ, कौतुकाने काही म्हणा, त्याला ते आवडत असते. या कवितेतील
लाडोबा- आहे घोडोबा.. तो म्हणतो..
घोडोबा मी घरी लाडका
खेळायला पुढे पुढे
शंभर टक्के परीक्षेत गुण
अभ्यासातही सदा पुढे ...(दोन पायांचा घोडोबा ..पृ.३८)
३. बाळाला खाऊ घालणे म्हणजे बाळाच्या आईसाठी सोप्पे काम मुळीच नसते ,अशावेळी बाळाचे दोस्त आले की अशी मजा येते..त्याची ही कविता -
बाळाची अंगत पंगत
पक्षी प्राण्यांची संगत
हातवारे बाळाचे
वाढत आहे रंगत .....(इवल्या इवल्या बाळाचे..पृ.२५)
४. चिऊताई आणि चिमुकला बाळ यांचे मैत्रीचे नाते खूप गोड असते. अंगणात येऊन गाणे म्हणणारी चिऊताई बाळाची आवडती आहे- यात आश्चर्य ते काय ?
दाणे पडले टप टप टप
चिमण्या गोळा पट पट पट
चिव चिव करता टिपती दाणे
टिपता टिपता म्हणती गाणे ...( चिव चिव गाणे ..पृ.१६)
५. बागेमधेे जाणे, तिथे मनमुराद खेळणे, फुलांनी बहरून गेलेल्या बागेत फेरफटका मारणे सर्वांनाच आवडते, ही कविता बागेत गेल्यावर, काय काय छान आहे हे सांगते..
बागेमधली विविध फुले
रंगामाधुनी कशी बहरती
रंग लेउनी मोहक अंगी
वाऱ्यावरती गंध पसरती ...(बागेमधला फेरफटका ..पृ..१४)
या शिवाय-- "ससा आणि कासव", "बंडू आणि परी", "अजबगजब", "ससे आणि जादुगार", "झुकझुकगाडी ", "माझे विमान", "शाळा ".. अशा अनेक कविता आहेत.. ज्यातून बालमनाचे भावविश्व साकारण्यात, कवी विजयकुमार देशपांडे मनापासून रमून जातात, जाणवत राहते .
साधीसोपी शब्दरचना, आवडते आणि परिचित विषय, कवितेला असलेला मायेचा, कौतुकाचा, वात्सल्याचा भावस्पर्श.. यामुळे विजयकुमार देशपांडे यांच्या या बाल-कविता लहानथोर सर्वांनाच खूप आवडतील- असा विश्वास वाटतो.
कवितेस अनुरूप रेखाटने चितारणाऱ्या कलावंत- कु.साक्षी संजय पुजारी यांच्या चित्रांचा उल्लेख करायला हवा. त्यांचे अभिनंदन ! प्रकाशिका- सौ. संयोगिता स्वामी व कुजबुज प्रकाशन लातूर.. यांनी हा सुंदर बालकवितासंग्रह प्रकाशित करून, बालमित्रांना कवितेचा खाऊ दिला आहे. त्यांना धन्यवाद !
["सखे तुझ्यासाठी" हा विजयकुमार देशपांडे यांचा चारोळीसंग्रह, या बालकवितासंग्रहासोबतच प्रकाशित केलेला आहे..]
------------------------------------------------------------------
पुस्तक-परिचय -
ले- अरुण वि.देशपांडे, पुणे
मो-९८५०१७७३४२
"चांदोबाचा दिवा" [बालमित्रांसाठी धमाल बालकवितासंग्रह]
------------------------------------------------------------------
"चांदोबाचा दिवा" (बालकवितासंग्रह).. कवी- विजयकुमार देशपांडे, संपर्क -९०११६६७१२७
पृ.४८, मूल्य- फक्त ४०/-

सहा चारोळ्या -
घाव खोलवर करून गेला
स्पर्श तुझा ओझरता झाला -
पुन्हा वाट पाहते जखम ग
अधीर स्पर्शाच्या मलमाला ..
.
घडला गुन्हा का माझा देवा
सुखाची राई मागितली मी -
केलास उभा पर्वत अख्खा
माझ्यापुढे दु:खाचा नेहमी ..
.
घरात बसून माझी आठवण
कितीदा काढणार तिकडे -
ये ना घरी माझ्या सरळ
त्रास उचक्यांचा थांबेल इकडे . .
.
घरट्यात जा स्वप्नपाखरांनो
पुरे झाले उगा रेंगाळणे -
थकली असेल आता सखी
आहेच पुन्हा रात्री न्याहाळणे ..
.
"घालावी गवसणी आकाशाला"
पाहत वर मी ठरवत गेलो -
खालचा खड्डा दिसला नाही
प्लास्टरमधे मी मिरवत आलो ..
.
घरात गातो, सुरात गातो
बाथरूम सिंगर तो गातो-
कपडे असतानाही गातो
नसताना तर जोरात गातो..
.
स्पर्श तुझा ओझरता झाला -
पुन्हा वाट पाहते जखम ग
अधीर स्पर्शाच्या मलमाला ..
.
घडला गुन्हा का माझा देवा
सुखाची राई मागितली मी -
केलास उभा पर्वत अख्खा
माझ्यापुढे दु:खाचा नेहमी ..
.
घरात बसून माझी आठवण
कितीदा काढणार तिकडे -
ये ना घरी माझ्या सरळ
त्रास उचक्यांचा थांबेल इकडे . .
.
घरट्यात जा स्वप्नपाखरांनो
पुरे झाले उगा रेंगाळणे -
थकली असेल आता सखी
आहेच पुन्हा रात्री न्याहाळणे ..
.
"घालावी गवसणी आकाशाला"
पाहत वर मी ठरवत गेलो -
खालचा खड्डा दिसला नाही
प्लास्टरमधे मी मिरवत आलो ..
.
घरात गातो, सुरात गातो
बाथरूम सिंगर तो गातो-
कपडे असतानाही गातो
नसताना तर जोरात गातो..
.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)